Thursday, June 23, 2011

काहीतरी नविन ! - २३ जून २०११

The best vitamin to be a happy person is B1.
- Unknown


बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
'साहेब, जरा काम होतं.'
'पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?'
'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.'
'अरे व्वा ! या आत या.'
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
'किती मार्क मिळाले मुलाला ?'
'बासट टक्के.'
'अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.
'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !'
'अच्छा, म्हणून पेढे वगैरे !'
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, 'साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते - शांत वातावरन ! - आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.'
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको - सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब - हा माझा आनंद आहे !'
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, 'शिवराम, मुलाचं नाव काय?'
'विशाल.' बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं -
प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन !
नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा !

'शिवराम हे घ्या.'
'साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.'
'हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.'
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
'चहा वगैरे घेणार का ?'
'नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...’
‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. ! या 'आणखी'च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान लिहून ठेवलंय –

सबका ख़ुशीसे फासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !

शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर कदाचित भरून निघालं नसतं.

30 comments:

  1. खरच खूप छान ...............आपणही आहे त्यात आनंद लुटायला हवाच ...............

    ReplyDelete
  2. सुंदर...तुमच्या शिवराम आम्हा लोकांनाही बरंच काही सांगून गेला आहे.

    ReplyDelete
  3. Atishay sundar.... kiti saadhi goshta aahe.. aani khup kaahi sangun geli.. agadi dole ughadle..

    Thank you for this...Made my day and coming days/weeks/months/years probably

    ReplyDelete
  4. Sahi aahe story....great

    ReplyDelete
  5. khoop sundar likahn aahe.. ni khoop kahi kan pilya milatat tumchya lekhatoon... khara tech sangta na... tyamule hridayala bhidta...

    ReplyDelete
  6. Far chan. Print gheun ghari vachun dakhawanar..
    Thank you very much.

    ReplyDelete
  7. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद साजरा करायला हवा. मग जग सुंदर वाटायला ला़गेल.

    ReplyDelete
  8. Navin Strikes again...great one !!! Hats off....if true story..then to ur observation/thinking....if not..then to ur ability to present goodies in sheer clarity & simplicity.....Amit

    ReplyDelete
  9. सुंदर!

    कवी मंगेश पाडगांवकरांच्या 'सिम्प्ली ग्रेट' ओळी आठवल्या -
    "आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
    जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद..."

    ReplyDelete
  10. Kale Saheb,
    tumcha lekh wachun fakta ekach shabda suchla..
    *Aprateem*
    Manapurvak Dhanyawad aani Abhinandan..

    -Ashish Mahajan
    Nagpur
    9822131258

    ReplyDelete
  11. Good thought and well composed likhan... avadale... what is your FB page so that we can get quick updates as and when you post new article.

    ReplyDelete
  12. Mast ahe re, manapasun avadale Mitra,
    Keep it up

    ReplyDelete
  13. actually अप्रतिम....

    ReplyDelete
  14. khupach chhaan, barach kahi shikata yeil ya likhanatun.

    ReplyDelete
  15. navin...khup chaan lihitos...asach lhit raha...ani amhala hasvat ani Radvat suddha ja...khup mast mast mast

    ReplyDelete
  16. Kahitari Navin
    Sankalpana khupach chhan.
    Bhag ghenaranche manahpurvak abhinandan!
    Hya linkla bhet dyayala khup avadhel.

    ReplyDelete
  17. kharach shivram sarkhe khupach kami mansa ya jagat naghayala milatata. je mile tyat aandand mananare. Must lekh lihila aahe

    ReplyDelete
  18. "माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
    परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं."...........तुमचा ब्लॉग खूप आवडला. उत्तम लिखाण!

    ReplyDelete
  19. great story..!!

    ReplyDelete
  20. नेहमीच्या जगण्यातले असे कितीतरी क्षण असतात... ज्यात आनंद भरलेला असतो आणि खरया अर्थाने आपण ते क्षण अनुभवायचे, जगायचे आपण राहूनच जातो जगायला हवेत असे छोटे छोटे क्षण... भविष्यात हेच ते क्षण असतात ते आपले आयुष्य सजवतात..!! अतिशय छान अशी हा लेख त्याचे सुंदर उदाहरण आहे..
    खपूच छान तुम्ही अशेच लिहित राहा..!!
    - शैलेश मांढरे (मुंबई)

    ReplyDelete
  21. सुरेख्.. धन्यवाद...

    ReplyDelete
  22. Thanks you God, for giving me those 100 reasons to be happy, in one form.
    It gives me strength to tackle with the other 1000s of reasons which make me unhappy.

    --btw, ya Navinya baddhal shatasha dhanyawad!

    ReplyDelete
  23. Thanks for nicely presenting the striking truth of unhappyness, through a small story.
    Strong enough for the reader to introspect.

    Keep writing!!

    ReplyDelete