Thursday, June 16, 2011

काहीतरी नविन ! १६ जून २०११

Wednesday 15 June

कसा आहेस? मी ठीक.
सॉरी, काल लिहू शकले नाही.
काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा 'सोहळा’ पार पडला.
'सोहळा’च तो. कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा !
थोडक्यात...म्हणून काल लिहिणं जमलं नाही.

आज वटपौर्णिमा होती. तू 'गेल्या'नंतरची पहिली....
काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.
मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले.
आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला - वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? - 'वडा-पाव' !
तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?
आणखी एक प्रसंग आठवला.
आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत 'उत्साहावरून' सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं 'माझा विश्वासc नाही'. तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.’
परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली. मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले.
आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या.
वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द ! अचानक काय वाटलं माहित नाही -भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !
Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !
सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला.
आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या.
आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली.
'हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!' गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.
माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता.
विक्रांत, आपण या जन्मात भेटलो खरे - पण तू 'मला असा' किती मिळालास?
पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस... हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.
त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका पण तुमच्या एकूण 'असण्याला'च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात.
तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता.
पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो. मी त्याला 'instinct' म्हणते.
भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. अशावेळी आपण फक्त आपल्या 'instinct' ने दिलेली आज्ञा पाळत असतो.
सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास? Vikrant, you just followed your instinct !

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते.
सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो. आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात 'शीला की जवानी' म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो !
हा paradox मला मान्य करावा लागतो.
तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका - माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही.
आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. 'तुम्हाला जगण्याची शिस्त नाही' म्हणायचास.
नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.
मी ही रोज लढते....
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते.
पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी 'अभिनय' करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते.
आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.

I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight ! - तूच म्हणायचास ना?

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली.
उद्या भेटू. बाय.

41 comments:

  1. really nice artical...

    sandip

    ReplyDelete
  2. khoop sundar... prachanda aawadata mala tumcha likhan.. thnak u

    ReplyDelete
  3. Apratim artical !!!!

    ReplyDelete
  4. Sundar lekh ahe...Forwarded to lots of friends...Fan of ur blog...

    ReplyDelete
  5. Khup sunder ahe tumche likhan, ase vatle aplyach manatle konitari bolte.

    ReplyDelete
  6. khupach chan article aahe.........

    ReplyDelete
  7. हॄद्य ! सुरेख जमलंय ...

    ReplyDelete
  8. very touching.....it sends us into her situation ..which is very in coming back status

    ReplyDelete
  9. khup khup chaan aahe

    ReplyDelete
  10. आत्‍म्‍याला स्‍पर्श करणारा लेख. अप्रतिम,खूपच छान

    ReplyDelete
  11. हे काय होतं !!

    ReplyDelete
  12. Good One.
    Loved reading it, very touching.

    ReplyDelete
  13. shabda ch kami padtat varnan karayla.. agdi thet javun bhidnare vichar... khup ch sundar

    ReplyDelete
  14. Simply Great. No words to express

    ReplyDelete
  15. मित्राने forward केलेला २३ जून चा लेख वाचून इथे शोधत आलो, आणि एक कसदार लेखक सापडला! बहोत खूब!

    आता तुमचं इतर लिखाणही वाचून काढतो.

    ReplyDelete
  16. MALA HE WACHUN KHARACH FAR WAAAIT WATLA...TICHA MANOGAT ANI TICH TE EKATAPAN KHUP SUNDAR VARNAN KELAY TUMHI. TUMCHA PRATYEK LEKH MI WACHATE..I REALLY LIKE IT VERY MUCH.
    ALL THE VERY BEST FROM ME..

    ReplyDelete
  17. khup khup sunder....kharokhar koni aaplyashi boltay asa vatata

    ReplyDelete
  18. Shivarm chi goshta eka forwarded mail madhe ali and from there I went to your blog site
    Apale likhan khup khup awadu lagale ahe

    ReplyDelete
  19. apratim angawar kata yeun jato vachatana aani barich kahi akkal hi shikvun jato..

    ReplyDelete
  20. vicharancha khup vegala angle. Chan lihita tumhi.
    tumhi asech lihit raha, aamhala changal vachayala milav mhanun. khup khup shubhchha!!!

    ReplyDelete
  21. Guruprasad KulkarniJune 30, 2011 at 6:33 PM

    Va.Pu. kale, Pravin Davane yanchyaitkach Sundar!

    ReplyDelete
  22. khupach sudar...ase vatte aple mitra kivva maitrin aplyashi boltay...

    ReplyDelete
  23. hi katha manala far bhavali aani he khara aahe.jagat tumhi kitihi shika , mothya padavar kam kara. pan samajat tumhala kadichihi kimmat nasate. hya smajachya chaliritipramane tumhi vaglat tar tumhi changale. nahi tar tumhi samajache shatru asech sambodhale jate. pan khara sangu khup kautuk aahe ashya stricha ji navara nastana ekti jagate... aani saglyanchi kalaji ghete.

    ReplyDelete
  24. AAJ PRATHAMCH EMAIL FORWARD MADHE TUMCHA 30TH JUNE CHA LEKH VAACHANAAT AALAA.....LAGECH BLOG VAR JAAUN ETAR ARTICLES HI VACHALEE.....KHARACH, AAYUSHYA HEY SAPTRANGI INDRADHANUSHYA SAARAKHE ASTEY KADHI DHUSAR TAR KADHI CLEAR RANGAACHI CHHATA ASLELE, HYACHA PUNHA EKDA PRATAYAY AALAA....

    ReplyDelete
  25. नमस्कार !
    बऱ्याचदा लेख वाचतो आपण... बऱयाच विषयांवरील लेख वाचतो... त्यावर चिंतन करतो...
    पण खूपच कमी लेख असे असतात की ज्यांना आपण अंतःकरणात सामावून घेतो...
    मी आज प्रथमच तुम्ही लिहिलेले ब्लॉग्वरील लेख वाचले...
    प्रत्येक लेख अंतःकरणावर कोरून ठेवावा असा आहे... त्यातील मूल्य, सौंदर्य आणि विचार तीनही आघाड्यांवर...
    आणि तुम्ही नियमीतपणे ब्लॉग लिहिता असे दिसते...
    त्यामुळे असे किती लेख अंतःकरणावर कोरून ठेवता येतील हा प्रश्न आहे...
    बहुधा, ज्याचे अंतःकरण जेव्हढे मोठे तेव्हढे अधिक लेख साठवता येतील असं म्हणायला हरकत नाही...
    पण खरोखरीच मला आपली शैली आणि विषयाची निवड-मांडणी नितांत आवडली..

    आपला नम्र,
    स्वरुप.

    ReplyDelete
  26. फारच हृदयद्रावक लेख आहे हा .....हि लढाई कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता स्त्री नेहमी लढतच राहील...आपले लिखाण मनाला भावणारे आहे ...

    ReplyDelete
  27. अरे कोण म्हणतंय मराठीत आताशा कसदार लेखन थांबलंय म्हणून ? हा घ्या एक नमुना ! माझ्या मित्राने पाठवलेला हा लेख वाचल्यानंतर, मागोवा घेत घेत या ब्लॉगपर्यंत कधी पाहोचलो, हे कळलंच नाही. आणि आता तर असं वाटतंय की, या नव्या दमाच्या लेखकाच्या साहित्याच्या रूपाने खजिनाच सापडलाय जणू ! मुग्ध केलं ! अप्रतिम !

    ReplyDelete
  28. unexpected but realy touching..........................

    ReplyDelete
  29. heart touching ..khoop sundar

    Thanks
    Netra Sawant

    ReplyDelete
  30. Atishay sunder. agdi mazya mantilach vichar ahet he. mi fakta tumchyasarkhe mandu shaknar nahi.

    ReplyDelete
  31. मराठी लिखाणात अजुनही किती ताकद आहे याचा अनुभव आला... अप्रतिम

    ReplyDelete
  32. You should consolidate your writing and publish a book...Let all other people enjoy who do not have computers at home !!! Its a request...

    ReplyDelete
  33. manala lagnara lekh ahe. khup apratim shabd rachana ahet. shabd mhannyapeksha bhavana ahet asa mhanav lagel.

    ReplyDelete
  34. It's so touchy! Could not control my emotionals! Keval apratim!

    ReplyDelete