Thursday, April 7, 2011

काहीतरी नविन ! ७ एप्रिल

If A is success in life, then A equals X plus Y plus Z.
Work is X; Y is play; and Z is keeping your mouth shut.
- Albert Einstein


एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही
तब्बल बावीस वर्ष, अख्खं जग त्याच्यामागे पागल होऊन राहतं..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण एका खेळामागे 'पागल' होऊन
स्वतःच्या आयुष्याची तीन दशके समर्पित करणं - यात त्याचं यश असावं !


तो शतक ठोकतो -
अख्खा देश त्याची पाठ थोपटतो
त्याचं शतक हुकतं -
अख्खा देश आपलं काम-धाम बाजूला ठेवून त्यावर चर्चा करतो
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण यशातही त्याचा ‘कान धरणारी’ आणि अपयशात त्याच्या पाठीशी उभी राहणारी
माणसं त्याच्या आयुष्यात आहेत - यात त्याचं यश असावं !


त्याच्या सोनेरी कारकीर्दीचा त्यालाच नाही
तर संपूर्ण देशाला अभिमान वाटतो
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या यशाला, कर्तुत्वाला गालबोट लागेल
अशी एकही कृती त्याच्या हातून घडत नाही - यात त्याचं यश असावं !


इतकी लोकमान्यता, इतके मानसन्मान, इतका पैसा
आता तर ‘विश्वचषक’...
... हे सगळं वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी !
इतक्या मुदलावर फक्त तोच काय, त्याच्या पुढच्या सात पिढ्या सुखात लोळू शकतील
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण कुठलेही मोहपाश त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत - यात त्याचं यश असावं !


त्याच्यावर स्तुतिसुमने उधळायला शब्द अपुरे पडतात
त्याच्या धावा मोजता मोजता आकडेही दमून जातात
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
...माहित नाही !
पण स्वतःच्या 'भरपूर' किंवा 'कमी' धावांवरून तो त्याचं यश किंवा अपयश ठरवत नाही...
‘कमी परिश्रम’ हे त्याला त्याचं अपयश वाटतं..
कारकीर्दीच्या या टप्प्यावर ‘असं वाटणं’ - यातंच त्याचं यश असावं !


क्रिकेट समजणारे- न समजणारे, क्रिकेट खेळणारे-न खेळणारे
त्याला 'क्रिकेटचा देव' मानतात..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण आकाशातलं 'देवपण' मिळून देखील
त्याची ‘मुळे’ जमिनीत खोल-खोल जाऊन आणखीनच घट्ट होत आहेत - यातंच त्याचं यश असावं !


इतकं यश, इतकं यश
की त्या यशाचं मोजमाप करणंही शक्य नाही..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.

पण एक गोष्ट नक्की.
... ‘त्या’ रात्री त्याच्या हातात विश्वचषक पाहून
‘त्याचा’ आनंद 'आपल्या' डोळ्यातून पाझरला...
यात त्याचं यश असेलच,
पण एक 'माणूस' म्हणून ‘आपलं’ देखील यश असावं !

7 comments:

  1. Parikshit MehendaleApril 8, 2011 at 12:18 PM

    Naav mention na karnyamaage hetu distoy - jyanna na sangtaach kalel tyanna mention karnyachi garaj naahi, jyanna mention karnyachi garaj aahe tyanna karunahi kahi vishesh kalnaar naahi !!

    Vishesh awadlaay matra GOD varcha !!

    ReplyDelete
  2. I don't think so Parikshit...if you ask even a kid,he/she will be able to answer.Anyways,I like the "Navinyapurna" presentation....

    Amit

    ReplyDelete
  3. creditable piece of work..lok koda aslya pramane ka comments kartet.. sunder lihila aahe matra...

    ReplyDelete
  4. नमस्कार !
    संदीप खरे यांनी सचिन वर एक कविता केली होती...
    त्यातील एक ओळ मला आठवते आहे...
    "पैज लागली असेल त्याची आत्म्यातील इमानाशी !"
    मला ती वाचल्यानंतर सचिनवर कोणी याहून अधिक उत्तम लिहू शकेल असे वाटलेच नव्हते...
    पण आज तुमचा ब्लॉग वाचला आणि माझा समज खोटा ठरला...
    इतके अप्रतिम वर्णन मी खरोखरीच कुठेही वाचले नव्हते...!
    माझी एक विनंती आहे... शक्य असल्यास हे काव्य खुद्द सचिन पर्यंत पोहोचवावे...!
    पुन्हा एकदा, असामान्य लिखाणाबद्दल मी आभारी आहे...

    ReplyDelete
  5. ahaaaa....hats of tooo navin!!!!!!!

    ReplyDelete
  6. एक 'माणूस' म्हणून ‘आपलं’ देखील यश असावं !

    kavita vachun..Mazyamadhaly Jiddila punha navin Aavhan Bhetale.

    ReplyDelete