Thursday, March 10, 2011

काहीतरी नविन ! - १० मार्च २०११

If you don’t like the way world is, you have an obligation to change it.

- Marian Edelman

परवा माझ्या एका मित्राने त्याच्या ऑफिस मध्ये घडलेली एक गोष्ट सांगितली. कंपनीच्या नेदरलॅण्ड स्थित ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका डच मॅनेजरने त्यांच्या जगभर पसरलेल्या शाखांमध्ये एक इमेल पाठवली.
त्या इमेलचा सारांश असा होता: "सर्वात प्रथम तुमची माफी मागतो. कारण आता मी जे सांगणार आहे त्याचा संबंध ऑफिसच्या कामाशी नाही आणि त्याहीपेक्षा मी तुम्हाला काही क्षणांसाठी गंभीर मूड मध्ये घेऊन जाणार आहे. झालंय असं की, माझ्या ओळखीच्या एका सात वर्षांच्या मुलीला कँसर झाला आहे आणि दहा दिवसांपूर्वी तिची केमोथेरपी सुरु झाली आहे. तिच्या आजोबांनी आणि तिने मिळून त्यांच्या घराच्या भिंतीवर एक जगाचा नकाशा लावला आहे. ती मुलगी काय करते, तिला ज्या ठिकाणाहून पत्र येतं, त्या ठिकाणी - जगाच्या नकाशावर - ती एक छोटा झेंडा लावते. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या देशातून तिला एक पोस्टकार्ड पाठवा...म्हणजे नकाशावर फक्त 'नेदरलॅण्ड' च्या जागेवर झेंड्यांची गर्दी होणार नाही! आपली कंपनी जगभर पसरली आहे म्हणून माझी ही छोटीशी विनंती आहे! "
हे सगळं ऐकल्यावर पाच मिनिटं निपचित बसून राहिलो. डोळ्यासमोर दिसत होतं नेदरलॅण्ड मधलं एक घर...घरातली एक भिंत...भिंतीवर लटकणारा झेंड्यांनी खचाखच भरून गेलेला एक नकाशा...प्रेमाचं हे एवढं मोठं ओझं पेलू न शकणारे एक आजोबा...आणि...जगणं काय असतं हे कळायच्या आधीच मरणाला रोज सामोरी जाणारी..... बस्स.. थोडया वेळाने भानावर आलो. कामात बुडालो. घरी जाताना पुन्हा नेदरलॅण्ड मधला नकाशा आठवला. मनात आलं, विचारांच्या प्रक्रियेत 'results' वर किती जास्त भर देतो आपण ! मग मला तो डच मॅनेजर आठवला. अशा प्रकारची इमेल पाठवायचं 'का' सुचलं असेल त्याला? जगभर पसरलेल्या आपल्या कंपनीच्या शाखांचा असाही उपयोग होऊ शकतो हे 'कसं' सुचलं असेल त्याला ? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण जेव्हा त्याला ही कल्पना 'क्लिक' झाली असेल तो खरा सोनेरी क्षण ! Creative माणसं या क्षणाला 'germ' म्हणतात. एखाद्या किड्याप्रमाणे त्या कल्पनेने त्या डच मॅनेजरचा मेंदू पोखरून काढला असेल. 'मी असं काय करावं ज्याने त्या मुलीची जगण्याची उमेद वाढेल' या विचाराने त्याला कदाचित रात्र रात्र झोप लागली नसेल.....

तुमचं झालंय असं कधी ?
झालं असेल तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच !
झालं नसेल तर मी म्हणेन, अजूनही संधी गेलेली नाही.
जगजीत सिंग एका ग़झल मध्ये म्हणतो - 'जिंदगी को क़रीब से देखो, इसका चेहरा तुम्हे रुला देगा !'
आपल्या भोवतालचं आयुष्य आनंदी करण्यासाठी आपल्याला केवढा वाव आहे !
त्यासाठी खूप पैशांची गरज नाही, खूप वेळ द्यायचीही गरज नाही.
गरज आहे ती 'creative charity'ची. जे त्या डच मॅनेजरने केलं.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काय 'बेस्ट' आहे ते आपण ओळखायचं. आणि आपल्याकडे असलेल्या त्या 'बेस्ट' गोष्टीची कोणाला गरज आहे ते शोधात राहायचं ! As simple as that !
(माझे आवडते आणि) प्रख्यात लेखक अनिल अवचट यांना माझे बाबा एकदा भेटायला गेले होते. दोघेही एकमेकांना प्रथमच भेटत होते. कामाचं बोलून झाल्यावर अनिल अवचट बाबांना म्हणाले, 'तुम्ही एवढ्या लांबून मला भेटायला आलात, तुम्हाला मी भेट म्हणून काय देऊ..?......मी तुम्हाला बासरी वाजवून दाखवू ?'
बाबांनी 'नाही' म्हणायचा प्रश्नच नव्हता. अवचटांनी बाबांना छान बासरी वाजवून दाखवली.
केवढी आगळी-वेगळी भेट होती ही ! व्वा !

खरंच सांगतो, इतरांसाठी करण्यासारखं खूप आहे.
काही उदाहरणं देतो. यातून तुम्ही clue घेऊ शकता....भोंगा वाजत जाणारी अम्ब्युलंस दिसली तर मनापासून 'गेट वेल सुन' म्हणा,घरी पेपर टाकणाऱ्या मुलाला, दुधवाल्याला, तुमच्या सोसायटीच्या वॉचमनला त्याचं 'नाव' विचारा, हॉटेल मधून बाहेर पडताना बाहेर 'तो' पाव-भाजीच्या तव्यावर भाजी 'कुटत' असतो ना, त्याला एक मिनिट थांबून 'पाव भाजी' मस्त झालेली असं सांगा, उन्हामध्ये उभं राहून ट्राफिक हाकणाऱ्या पोलिसाला एक थंड पाण्याची बाटली द्या, तुमच्या घरी नियमित येणाऱ्या पोस्टमनला चपलांचा एक चांगला जोड भेट म्हणून द्या....
......तुमच्या या अनपेक्षित कृतीमुळे समोरची व्यक्ती कदाचित गोंधळेल. तुम्हाला कदाचित 'thank you' म्हणायलाही विसरेल. दोष त्या व्यक्तीचा नाही. कोणी चांगुलपणा दाखवला की आपल्याला त्याचा संशय येतो हे सध्याचं वास्तव आहे. पण आधी म्हटलं त्या प्रमाणे 'results' वर भर देऊ नका.. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी 'छान' करतोय ही प्रोसेस एन्जॉय करा ! तुम्हालाच किती मस्त वाटेल ते बघा !

काही वर्षांपूर्वी एक गोष्ट ऐकली होती. त्या एका गोष्टीने माझा 'charity' विषयी बघायचा दृष्टीकोन बदलला. ती गोष्ट सांगतो आणि थांबतो.

गोष्ट आहे परदेशातील. एक प्रसिद्ध खेळाडू होता. एका स्पर्धेत तो पहिला आला. लाखो डॉलर्सचा चेक त्याला बक्षीस म्हणून मिळाला होता. तो जिंकून घरी जात असताना त्याची गाडी सिग्नलपाशी उभी राहिली. एक बाई त्याच्या गाडीशी आली. म्हणाली, 'माझा मुलगा खूप आजारी आहे. माझ्याकडे औषधालाही पैसे नाहीत. काही मदत केलीत तर खूप उपकार होतील.'
त्या खेळाडूने खिशातून त्याच्या बक्षिसाचा चेक बाहेर काढला. मागचा-पुढचा विचार न करता तो चेक त्याने त्या
बाईच्या नावाने endorse करून तिला दिला !
दहा बारा दिवसांनी त्या खेळाडूचा एक मित्र धावत धावत त्या खेळाडूकडे आला. म्हणाला, 'मागे तू ज्या बाईला लाखो डॉलर्सचा चेक दिलास ती लोकांना खोटं-नाटं सांगून पैसे उकळत होती. मुलगा आजारी आहे, औषधाला पैसे नाहीत हे सगळं झूठ होतं… तुझे आणि बऱ्याच लोकांचे पैसे घेऊन ती बाई गायब झाली आहे. पोलीस तिच्या शोधात आहेत.'
काही क्षण स्वतःशीच विचार करत तो खेळाडू हसून म्हणाला, 'मला हे ऐकून आनंद झाला की जगात एक लहान मूल आजारी नाहीये !'

अशा प्रकारच्या 'संत' पदापासून आपण सगळेच कोसो दूर आहोत, याची जाणीव आहे मला.
पण 'जगण्याच्या' या दिंडीत आपण एक वारकरी म्हणून सामील व्हायला काय हरकत आहे ?

18 comments:

  1. Chatak laavali ahes Mitra...tuzya lekhanchi...Amit

    ReplyDelete
  2. नवीनजी नमस्कार. वा! क्या बात है! खुप सुंदर लिहलय तुम्ही.हा लेख
    माझ्या मेल वर फॉरवर्ड होता.त्यावरुन तुमच्या ब्लोग ला भेट दिली.नवीन आणि सुन्दर असं वाचायला मिळालं.खुप धन्यवाद तुम्हाला.

    ReplyDelete
  3. Chabuk NAvven saheb.... 'Gokul' varacha chaha pinaar ka?

    ReplyDelete
  4. Khupach chan ahe la lekh,
    shwevti tunchya var kase sanskar jhalet ya var sagal avlambun asat ..anu tumnhi tumache kiti add karta tyat to make it better ...

    ayushya far lahan ahe tyamadhe asha chotya chtoya gosthimadhun anand milvay cha asto :-)

    ReplyDelete
  5. dole paanavel ... kharach khup sundar lihilat

    ReplyDelete
  6. kharach aayshyat khoop kahi karavese vatat aste... pan nakki kay aani kutun survaat karavi te suchat naahi .... aapla blog vachalyavar sunder kalpana aani tyatunach kahitari naveen bhet milali .... dhanyavaad!

    ReplyDelete
  7. ultimate,awesome..........he shabda tokde vatatat tujha ha lekh vachun.......Uttam lihla aahes. Vachlyapasun vicharadheen aahe mi

    ReplyDelete
  8. tumhi khoop uttam lihita.. wachatach rahawa as awatata.. kharach khoop chaan sir..

    ReplyDelete
  9. Khooop divsanni ase kahitari chhan vachayche bhagya labhale

    phudil likhana sathi khoop khoop shubheccha...

    shakya titkya lokanparaynt pohochavnaycha ek praytna jarur karnar.....

    ReplyDelete
  10. डोळ्यात पाणी आले ... सुंदर लेख !!!

    ReplyDelete
  11. खुपच छान ....नुसतं लिखाण नव्हे तर ह्या लिखाणातून जो काही विचार मांडला आहे तो हल्ली खूप कमी बघायला मिळतो...I would say by writing such kind of blog your doing a very nobel thing...अप्रतीम...खरंच डोळ्यात पाणी आलं...

    ReplyDelete
  12. सुंदर. छोटसं पण हृदयस्पर्शी. खरच, आपल्या कधीच लक्षात येत नाहीत अश्या कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण अगदी सहज करू शकतो पण घडत नाहीत. न करण्यामागे बेफिकीर वृत्ती असतेच असही नाही पण मग बहुदा नसते ती Creativity. नाही येत तो germ ... पण हे वाचून त्या germ ची जाणीव करून दिलीत, जो प्रत्येकात असतोच असतो त्याबद्दल धन्यवाद. :)

    ReplyDelete
  13. really nice article.........

    will look forward for some more good heart touching articles.

    ReplyDelete
  14. Wah saheb... Dhannyawad.. Sukun gelelya eka 'zadala' jashi nawi paalavi milali tumcha lekh wachun.

    Thanks a lot.
    God bless u.

    ReplyDelete
  15. " विचारांच्या प्रक्रियेत 'results' वर किती जास्त भर देतो आपण. 'results' वर भर देऊ नका..
    आपण दुसऱ्यासाठी काहीतरी 'छान' करतोय ही प्रोसेस एन्जॉय करा ! तुम्हालाच किती मस्त वाटेल ते बघा ! "
    खूप छान. खूप महत्वाची गोष्ट सोप्या शब्दात मांडली आहे. एकदम पटली.
    नवीनजी, share केल्याबद्दल धन्यवाद.
    one liners / quotes आणि त्यावरचे आपले लिखाण खूप आवडले.

    ReplyDelete
  16. सुरेख, गेले काही महिने आपले लेख मेल वर वाचत होतो, आता तोवर थांबायची गरज नाही...धन्यवाद्...

    ReplyDelete
  17. I am addicted sir..how can u write so amazingly..pls dons top writing..i wish if i had come across yur site bfore..thnx to the person who sent me yur lekh in an email..

    ReplyDelete