Wednesday, August 10, 2011

लवकरच..........

ध्यानीमनी नसताना कुठूनतरी एक गाणं कानावर पडतं आणि आपलं बोट धरून आपल्याला आठवणींच्या प्रदेशात घेऊन जातं.
अमुक गाणं ऐकल्याशिवाय आपण लहानपणी घास घेत नव्हतो असं आई सांगते...
तमुक गाण्याने आपल्याला प्रेम करायला शिकवलेलं असतं...
निराशेच्या काळात अमुक गाण्याने आपले डोळे पुसलेले असतात... तमुक गाण्यावर नाचता नाचता घामाबरोबर आपल्या विवंचनाही वाहून गेलेल्या असतात...
मनातल्या मनात लिंबू पिळून देखील तोंडाला पाणी सुटावं तसं एखादं गाणं ऐकताच मेंदूत आठवणींचा एक चित्रपट सुरु होतो.
आणि मग श्वास घ्यावा पण तो समजू नये इतक्या सहजपणे आपण ते गाणं अख्खा दिवस गुणगुणत राहतो.
आपण दिवसभर आनंदी का होतो हेही विसरायला लावणारं - साँग ऑफ द डे !

ही गाणी तुम्ही एका ठराविक काळात बांधू शकणार नाही. म्हणूनच ती गाणी 'अमर' असतात.
अशा 'अमर' झालेल्या गाण्यांचेही दोन प्रकार असतात.
'चोली की पीछे क्या है' सारखी गाणी लौकिकार्थाने 'अमर’ गाणी असतीलही. परंतु अशी गाणी अश्वत्थाम्याप्रमाणे
आपल्या कपाळावर जखम बाळगून मोक्षासाठी वणवण भटकत असतात. त्यांचं चिरंजीवित्व हे शापित असतं.
पण 'आयेगा आनेवाला' सारख्या गाण्यांचं चिरंजीवित्व हे 'हनुमाना'सारखं असतं.
त्यांना मोक्षाचा हव्यास नसतो. त्यांच्या जीवनाविषयीच्या श्रद्धेमध्येच त्यांचा मोक्ष असतो.

ज्या गाण्यांनी मला घडवलं आणि रडवलं...
ज्या गाण्यांनी मला हसवलं आणि फसवलं...
ज्या गाण्यांमध्ये मी स्वतःला हरवलं आणि मलाच पुन्हा पुन्हा मिळवलं...
अशा 'तृप्त चिरंजीव' गाण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेऊन येतो आहे -
माझी पुढील लेखमाला - साँग ऑफ द डे !


ही संगीत समीक्षा नाही. या गाण्यांनी मला जे दिलं ते मी फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे.
एखादं गाणं जसं अवचितपणे कानी येतं तशीच ही लेखमाला असणार आहे.
यातील एखादा लेख कधी तीन-चार दिवसांनी येईल तर कधी दहा-बारा दिवसांनी देखील.
या लेखांच्या 'अनियमित' असण्यातच खरी मजा आहे, हे तुम्हालाही हळूहळू पटेल !


http://navinsong.blogspot.com/

11 comments:

  1. अप्रतिम! वाटच पाहात होतो! :-)

    ReplyDelete
  2. वाटच पाहत आहे .... विषय छान निवडला आहे....
    माझी हि पहिलीच प्रतिक्रिया आहे पण मी सर्व लेख वाचले आहेत...मस्तच आहेत म्हणून तर पुढच्या लेखाची उत्सुकता आहे


    वरील लेख मधील पण मोक्षाची कल्पना छानच आहे....

    ReplyDelete
  3. Thanks and eagerly waiting for it...

    "सुर मागू तुला मी कसा, जीवना तु तसा मी असा"...या गाण्याची आठवण ज्ञाली, इतक्या वर्षांआधी सुरेश भट काय सांगून गेले हे कळलं...Life Expected and Life Lived are two different things..

    ReplyDelete
  4. wav gr8 concept....we wl defenately njoy...

    ReplyDelete
  5. Hey Navin,
    Thank you very much...
    You are writing again on this blog, that's the great news itself...
    I am waiting desperately....


    thanks
    Suyog

    ReplyDelete
  6. Khupach wat pahayala lavu naka, chukalyasarkh watatay, mala tumchya lekhanat vapu distay.

    ReplyDelete
  7. Thanks ! You can read my new articles on
    http://navinsong.blogspot.com/

    ReplyDelete
  8. mi aaj pahilyandach hya sitela bhet diliye. khup chan ahe.....

    ReplyDelete
  9. Why separate blog, write here only. So we have only one place to read.

    ReplyDelete
  10. Mastach ahe yaar... Waiting!!! :)

    ReplyDelete