Tuesday, November 22, 2011

'काहीतरी नविन' येतंय.... !


|| श्री ||

सप्रेम नमस्कार !

'काहीतरी नविन' या माझ्या सदरास आपण जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.
माझे हे लेख इमेल, फेसबुक यांच्या माध्यमातून अक्षरशः जगभर फिरले.
सर्वात जास्त प्रतिसाद मला तरुण मित्र-मैत्रिणींकडून मिळाला ही गोष्ट मला मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते.
कमी वाचणारे किंवा कधीही न वाचणारे या सदरामुळे मराठी 'वाचते' झाले असतील तर ही माझ्या लेखी समाधानाची बाब आहे.

माझ्या या लेखन वाटचालीत आता आणखी एक अभिमानास्पद पाऊल पडते आहे आणि त्यासाठी आपल्या शुभेच्छांची गरज आहे !

२७ नोव्हेंबर २०११ रोजी 'काहीतरी नविन' या माझ्या पुस्तकाचं 'राफ्टर पब्लिकेशन्स'तर्फे प्रकाशन होतंय !

पुस्तकाच्या माध्यमातून एकत्र केलेले माझे निवडक तीस लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
त्यास तुम्ही सर्वजण उत्तम प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

आणखी एक आनंदाची आणि गौरवाची बाब नोंदवावीशी वाटते.
आपल्या अंध मित्रांना 'काहीतरी नविन' वाचता यावे म्हणून संपूर्ण पुस्तकाचे 'ब्रेल' लिपीत रुपांतर केले जाणार आहे.
या कामात पुण्याच्या ‘निवांत' संस्थेचे आनंद बडवे-मीरा बडवे मदत करणार आहेत. ब्रेल लिपीतील पुस्तक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'राफ्टर पब्लिकेशन्स’ प्रयत्नशील असणार आहे.
या कार्यात तुमचाही सहभाग असेल तर दुधात साखर !

एका खाजगी समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन होईल.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे पुस्तक बाजारात विविध माध्यमातून उपलब्ध होईल.
हे पुस्तक फक्त भारतातच नाही तर परदेशातील वाचकांना वाचता यावं यासाठी देखील काही उपाययोजना असणार आहेत.
आपली प्रत राखून ठेवण्यासाठी तसेच पुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया इथे संपर्क साधावा:
rafterpublications@gmail.com
उमेश: 98205 27619 / रोहन: 98209 89320 / रोहन: 98200 80081

आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय.
लोभ आहेच, तो अधिक वृद्धिंगत व्हावा ही विनंती !

आपला
नविन

8 comments:

  1. सकाळीच तुमच्या पोस्ट ची आठवण आली होती! योगायोग!
    अभिनंदन, पुढच्या वाटचालीकरिता शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. अभिनंदन!!!
    तुमचे सर्वच लेख अतिशय सुरेख आहेत..प्रत्येक लेख मनाला स्पर्शून जातो...आणि आता तुम्ही ते पुस्तक रूपात प्रदर्शित करत आहात ही खूपच मस्त बाब आहे...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  3. Congratulations Dear !!! May God bless you in many more success stories ahead...
    Amit

    ReplyDelete
  4. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आशा करतो आपले पुढचे लेख असेच आनंद देवोत.

    ReplyDelete
  5. Congratulations....Good..... some more new things for us :) keep it up..

    ReplyDelete