Thursday, July 28, 2011

सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे !

नमस्कार मंडळी,

आज कुठला लेख नाही कारण 'काहीतरी नविन' ही मालिका मागच्या गुरुवारीच संपली आहे.
आज थोडं मन मोकळं करणार आहे.

'काहीतरी नविन' या मालिकेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे तो निव्वळ शब्दातीत आहे.
या मालिकेत केवळ वीस लेख होते. या लेखांचे विषय, लेखाची भाषा, मांडणी आणि त्यांचा आकार यावर खूप विचार केला गेला होता.
आज जो-तो कशाना कशाच्या मागे धावतो आहे. कामधंदे सांभाळून घर सांभाळताना "वाचन -चिंतन" ही चैन वाटावी अशी आज परिस्थिती आहे.
म्हणून लेखाचे विषय रोजच्या जगण्याशी निगडीत राहतील याची काळजी घेतलीच, पण त्याचा आकारही इतकाच ठेवला की ते पाच ते सात मिनिटात वाचून होतील आणि 'आणखी काही हवं होतं' असं वाटत असतानाच ते संपतील !
प्रत्येक लेख वाचून हे जग बदलेल इतका भाबडा मी नक्कीच नाही परंतु लेख वाचून झाल्यावर वाचकाला काही वेळ 'फ्रेश' वाटावं इतकी साधी अपेक्षा आहे.
माझी ही अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असावी अशी आशा आहे.

हा लेख कुठल्याही वर्तमानपत्रात वा मासिकात छापून येत नसे. तरीही दर गुरुवारी एक नवा लेख लिहून मी तो काही लोकांना इमेलने पाठवत असे, फेसबुक वर टाकत असे आणि या ब्लॉगवर टाकत असे.
यातील नियमितपणामुळे वाचकांना या लेखांची सवय लागली होती.
मला शेकडो इमेल्स येत होते परंतु ब्लॉगवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांकडे माझं लक्षच नव्हते.
आज पाहतोय तर हा ब्लॉग ३६,००० (छत्तीस हजार) हून जास्त वेळा वाचला गेला (Page views) अशी माझ्याकडे याघडीला लेखी नोंद आहे. इतकंच नव्हे तर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. (या सर्व प्रतिक्रिया तुम्ही देखील वाचू शकाल.) कोणत्याही वर्तमानपत्राच्या वा मासिकाच्या पाठबळाशिवाय एखादे सदर वाचकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचू शकते याचा हा जर पुरावा असेल तर नव्या लेखकांसाठी हे एक उदाहरण ठरू शकेल. आजची पिढी मराठी वाचत नाही या आरोपाला हे सणसणीत उत्तर असू शकेल.

या फक्त तुमच्या प्रतिक्रियाच नाहीत तर समाजमन अजूनही संवेदनशील आणि जिवंत असल्याची ही खूण आहे असं मी मानतो.
प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणे शक्य नाही म्हणून आज या मनोगताद्वारे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. 'त्या पाच-सात मिनिटांत' माझ्या लेखांनी तुम्हाला काही आनंद दिला असेल तर माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे.

मी एका लेखन-विषयक प्रकल्पात व्यग्र आहे त्यामुळे यापुढे काही दिवस या ब्लॉगवर लेख नसतील.
माझ्या नव्या प्रकल्पाची घोषणा मी लवकरच करेन.
आपणास विनंती आहे की आपण navin.kale@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधलात तर यापुढे मला तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल. आपल्याशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे.

असाच लोभ राहो ही विनंती,

आपला
नविन

17 comments:

  1. Kahi Tari Haravalyachi bhavana Zali. Manala chut put lagali...murlipra

    ReplyDelete
  2. तुम्ही तुमच्या पुढील ब्लॉग किंवा wesbite जे काही असे,ल ज्यात तुमचे लेख/ब्लॉग वाचता येतील याची weblink कृपया या ब्लॉग वर post करावी, जेणे करून आम्हाला ते लेख वाचता येतील..
    धन्यवाद.

    ReplyDelete
  3. pls do inform about ur new arrivals

    ReplyDelete
  4. Awaiting for your new project !!

    Thanks,
    Mandar

    ReplyDelete
  5. Keep sharing, you have an obligation to because you can speak people's mind!

    ReplyDelete
  6. I just recently come across this site & I was so happy I thought u will keep writing..I m really disheartened today..pls let us know here if u write somewhere else..i m gonna recommend this site to everyone i know..

    ReplyDelete
  7. Agreed to Mr.Sameer Bhave....& will miss u

    ReplyDelete
  8. lekh khupach sundar ahet. manala chatka lawnare.. yapudhe ase kahitari wachayla milave ashi mafak apeksha.. khara tar tumchyach bhashet ' wachan-chintan'achi chin karayla welch milat nahi.. 5-7 mintache atmchintan matr sahaj jamt hote..

    tumchya navin kamal shubhechha..

    ReplyDelete
  9. आपली पत्रभेट काही काळासाठी का होईना पण थांबणार, याचे वाईट वाटते. मात्र, लवकरच "नवीन काहीतरी" आपण सादर करावे यासाठी वाट पाहत राहू. नवीन लेखन प्रकल्पासाठी माझ्या अनेक शुभेच्छा!
    - धनंजय जठार

    ReplyDelete
  10. नवीन लेखामालेविषयी जरूर कळवा...we will miss you writing...

    ReplyDelete
  11. तुमचा ब्लॉग माझ्या रीडरमध्ये आहे. त्यामुळे "नवीन काहीतरी" आले तर लगेच समजेलच. तुमच्या लेखनाने आनंद दिला! धन्यवाद!

    ReplyDelete
  12. Dear नविन,

    मागील काही दिवसांपासून तुमचा ब्लॉग वाचत आहे. 'काहीतरी नविन' मधून तुम्ही मांडलेले विषय खूप आवडले. तुमची लेखन शैली आवडली. तुम्ही ब्लॉगवर तुमची ओळख एक प्रकारे लपवून ठेवली. त्यामुळे तुमच्याबद्दल जाणून घेण्याची, तुमची माहिती मिळवण्याची एक उत्सुकता होती.

    तुमच्या बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करताना, आज हे समजले की, तुम्हीसुद्धा एक माजी-आर्यकुमार आहात.

    तुमच्या पुढच्या लेखन कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या पुढील लेखाची / ब्लॉगची वाट पाहत आहे.

    मंगेश

    ReplyDelete
  13. Many wishes to your new work..:)
    waiting for new blog.:)
    All the best
    God bless you........!!!!
    Please dont stop writing do at least 1 post each month on this blog!!!!

    ReplyDelete
  14. Hey..Tumche lekh khupach chaan aahet aani mi tar nehamich navin navin lekh chi vaat pahat asato.. mala marathi vachnyache khup ved aahe.. bare zhale marathi family madhe jalmala aalo manun tumache lekh tari vachayala milatat.. please don't stop your writing , khup chaan lihata tumhi

    ReplyDelete
  15. missing you ..

    ReplyDelete