Thursday, July 21, 2011

'काहीतरी नविन' - २१ जुलै २०११

खूप दिवसांनी (म्हणजे दोन दिवसांनी!) इमेल्स बघत होतो. इनबॉक्समध्ये इमेल्सचा ढीग.
एका इमेलने लक्ष वेधून घेतलं. इमेलचा विषय होता - 'काहीतरी नविन'.
एका वाचकाने forwarded इमेल म्हणून माझा एक लेख मलाच पाठवला होता. लेखाच्या वर-खाली लेखकाचे नाव कुठेच नाही.
असा प्रसंग आधीही दोन-तीनदा घडला होता. त्यावेळी जे केलं होतं तेच आत्ताही पट्कन मनात आलं -
'Reply all' करून सांगून टाकावं का, या लेखाचा लेखक मीच आहे म्हणून ?
माझ्या आतल्या अहंकाराने माझा हात माउसशी नेला आणि मी 'reply all' लिंकवर जाऊन क्लिक केलं.
शब्द टाईप केले आणि पुन्हा डिलीट केले. पण आतल्या अहंकाराला भूक लागली होती. मी पुन्हा शब्द टाईप केले.
मनाची ही घालमेल चालू असतानाच एका मित्राचा मोबाईलवर फोन आला.
'अरे, एक तातडीची मदत हवी आहे.'
'बोल.'
'कुहू कुहू बोले कोयलिया' या गाण्याचा संगीतकार कोण आहे ?'
'आत्ता आठवत नाहीये. पटकन नाव आठवणार नाही असा कोणीतरी आहे.'
'जरा गुगल वर बघून सांग !'
'केबीसी मध्ये अमिताभच्या समोर बसलायस का तू ? थोड्या वेळाने फोन कर. मी बघून सांगतो.'
' जाऊ दे, तुझा मूड ठीक दिसत नाहीये. जाऊ दे, मरू दे तो संगीतकार ! मला हे गाणं खूप आवडतं म्हणून उत्सुकता होती बाकी काही नाही. नंतर फोन करतो.' मित्राने फोन ठेवला.
मरू दे तो संगीतकार ? मित्राचे शब्द पेटत्या बाणासारखे मनात आरपार घुसले.
ते गाणे जन्माला येण्यासाठी त्या संगीतकाराने केवढी मेहनत घेतली असेल ! स्वतःची तहान- भूक - झोप विसरला असेल, कदाचित त्या दरम्यान बायको-मुलांकडे दुर्लक्ष देखील झालं असेल.
त्याचं या निर्मितीत काहीच योगदान नाही ? तो आज कोणाच्याच लक्षात नाही ?
मनाला चटका बसल्यासारखं झालं आणि त्याच वेळी आत उसळी मारणाऱ्या अहंकाराला एक चपराक देखील बसली.
'कुहू कुहू बोले कोयलिया' ची ही अवस्था तर 'काहीतरी नविन' बद्दल विचार न केलेलाच चांगला.
कलाकारापेक्षा 'कलाकृती' मोठी हे अगदी मान्य !
म्हणजे माणसाच्या सर्जनशीलतेला, मेहनतीला, कलाकृती उत्तम करण्याच्या ध्यासाला काहीच किंमत नाही?
याची अर्थातच दोन परस्परविरोधी उत्तरे असतील. परंतु माझ्या आजतागायतच्या अनुभवाने जे उत्तर दिलं त्याने माझ्या आत उसळी मारणाऱ्या अहंकाराला नक्कीच एक चपराक बसली.
कलाकाराची सर्जनशीलता, त्याची मेहनत, त्याचा ध्यास हे सगळं मान्य ! पण एखादी कलाकृती घडण्यासाठी तो कलाकार केवळ एक instrument म्हणून वापरला जात असतो.
हा दुर्मिळ अनुभव आलेले कलाकाराच ही गोष्ट समजू शकतात.

मुळात एखादी गोष्ट ‘सुचते’ याला कुठलंच logical explanation नसतं. ए.आर. रेहमान झोपलेला असताना त्याला ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ या सुफी रचनेची चाल सुचते. रेहमान स्वप्नातून जागा झाल्यासारखा पियानोवर बसतो आणि ते गाणं पूर्ण करतो. याचा अर्थ इतकाच असतो की ती कलाकृती घडण्याची जबाबदारी रेहमानवर टाकण्यात आलेली असते. यशाच्या शिखरावर असलेला रेहमानसारखा प्रतिभावंत कलाकार देखील हे खुल्या मनाने मान्य करतो याचं कारण अशा माणसांचा त्यांच्या कलेच्या रियाझाबरोबर ‘जगण्याचा’ रियाझ देखील तितक्याच प्रामाणिकपणे चालू असतो. आणि म्हणूनच अशा अलौकिक अनुभवांचे अत्तरथेंब त्यांच्या हृदयात झिरपतील इतकी त्यांच्या आत्म्याची मशागत सतत चालू असते. खरं तर माणूस सोडून सगळेच जीव एक ‘अ-नाम’ आयुष्य जगत असतात. आपल्या सुवासाने झिंग आणणाऱ्या रातराणीच्या फुलांवर कधी तुम्ही नाव लिहिलेलं पाहिलंय ? ओंजळीत साठवलेल्या झऱ्याच्या पाण्यावर त्या पाण्याचं नाव तरंगताना कधी पाहिलंय ? खिडकीतून भिंतीवर पडलेल्या कवडश्यावर तुम्ही कधी नेम-प्लेट लटकलेली पाहिल्येत? हे अशक्य आहे कारण खरा आनंद देणाऱ्या (सुख नव्हे) सर्व गोष्टी, व्यक्ती एका self-less व्यवस्थेचा भाग बनून आपलं काम निमुटपणे करत असतात. कदाचित म्हणूनच, संगीतातील सात सूर ज्यांनी शोधले त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात. आपल्या बोली भाषांचे जनक, अजंठा वेरूळ सारख्या कलाकृती घडवणारे जादुगार, निरनिराळे खाण्याचे पदार्थ शोधून काढणारे अवलीये आपल्यासाठी ‘अज्ञातच’ राहतात. आपल्याला हे सगळं पचवणं जड जातं कारण आपण अशा एका जगात राहतो की जिथे स्वतःचं नाव सतत झळकण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या ‘जागा’ इंचात आणि ‘वेळा’ सेकंदात विकत घेतल्या जात आहेत. आपण अशा एका जगात राहतो जिथे घरातून बाहेर पडताच आपल्याला ‘स्वतःचीच पाठ थोपटून घेणारी’ राजकारणी मंडळीची ओंगळवाणी पोस्टर्स बघावी लागतात. माणसं गड किल्ल्यावर जाऊन आपली स्वतःची नावे कोरून येतात यावर आमची मित्रांची चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, कुठल्यातरी गडावर म्हणे एक पाटी लावली आहे – ‘कृपया आपली नावे गडाच्या भिंतीवर लिहू नका. शिवाजी महाराजांनी इतके गड किल्ले जिंकले-बांधले पण कुठल्याच गड-किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही लिहिलं !’ मला हे नुसतं ऐकूनच गहिवरून आलं. आपल्या कामात आपला ‘स्व’ इतका विरघळवून टाकायचा की ते काम आणि त्या कामातून मिळणारे फळ वेगळे राहूच नयेत – काम हेच त्या कामाचे फळ. हाच कर्मयोग ! सकाळी जागं झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत - म्हणजे टूथब्रशपासून टूथपिकपर्यंत - असंख्य वस्तू आपण वापरतो ! कोण कुठले अज्ञात हात माझ्यासाठी राबतात आणि माझ्या आयुष्यात आनंद, आराम आणि समृद्धी आणतात ! पण मीही कुठेतरी-काहीतरी काम करतो. याचा अर्थ माझ्या हाताने बनवलेल्या वस्तू किंवा मी देत असलेल्या सेवा हजारो अज्ञात व्यक्तींच्या आयुष्यात आनंद, आराम आणि समृद्धी आणत असतील ! एकदा ही मेख लक्षात आली की सगळ्या गोष्टींकडे बघायचा दृष्टीकोनच बदलून जातो. मग घरातला साधा केर काढण्यापासून ते देशासाठी उपग्रह बनविण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ‘कलाकृती’ समजून घडवल्या जातात आणि त्या कलाकृतीला घडविणारा कलाकार स्वतःच्या अस्तित्वाची एकही निशाणी मागे न सोडता त्या कलाकृतीमध्ये विरघळून जातो. गुलजार साहेब म्हणतात त्याप्रमाणे -
‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा,
मेरी आवाजही पेहचान है – (अ)गर याद रहे !’
एका कलाकृतीचा जन्म होईल. काळाच्या ओघात कधी कुणाला आठवण आलीच तर त्या कलाकृतीचा निर्माता लुप्त झाला असेल – पण ती कलाकृती जिवंत असेल.
कारण कलाकृती हीच त्या कलाकाराची खरी ओळख असेल !

‘तो लेख माझा आहे’ हे शब्द मी अर्धवट लिहून सोडलेल्या इमेलमधून कायमचे पुसून टाकले आहेत.
मी लिहितो तेव्हा ते शब्द 'माझे' नसतात, I am a mere 'trustee' of those words !
कोणी हे मान्य करेल वा न करेल.
पण मला विचाराल, तर हेच अंतिम सत्य आहे !

29 comments:

 1. i am the one who had sent screenshot of ur blog as fwd to my frnds few days back since not all of them can access blogs in office. In next 24 hhours i received the same fwd from 3-4 diff people.

  but when i took screenshot, i had made sure i include blog name and url too, dont know if anyone altered that part while fwding.

  Sorry.

  -Nisha

  ReplyDelete
 2. apratim lekh lihila gela ahe tumchya madhyamatun! :) :) bharpur avadla haa vichar. hey satya manya karna kahi lokana kadachit avghad hi jail..

  i also received a similar mail last week (it was an attached pdf file though with the blog name) from a friend and started following it. i would only say that the 'trustee' of the words in this blog is truly gifted. :)

  ReplyDelete
 3. खूप वेगळ लिहिलं आहे आणि अर्थातच छान लिहिलय. पण पचवणं जरा अवघड आहे. :) खूपच छान लिहिता तुम्ही.

  ReplyDelete
 4. ज्या सुंदर शब्दांचे तुम्ही धनी आहात ते शब्द वाचून अनेक जणांना आनंद मिळतो आहे! हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी असतं आणि त्याचं श्रेय केवळ तुम्हाला मिळत राहील! मला देखील तुमचा तो लेख एक forward म्हणून आला होता पण त्यात या ब्लॉग चा पत्ता देखील होता आणि तेव्हापासून मी हा ब्लॉग नियमित वाचते!

  ReplyDelete
 5. तुमच्यामुळे मलाही हे Realisation होते आहे , हे बरे झाले . तुम्ही मांडलेली trusteeship ची संकल्पना अगदी पटली .

  ReplyDelete
 6. बालगंधर्व मधील परवदिगार गाण्यात कलाकाराच्या साहित्यिकाच्या आयुष्याबद्दल सार्थ लिहिलय .. मला वाटतं तुम्ही बोललात ते खरंच पण रसिकाने स्वताहून मान देण हे त्याच कर्तव्य आहे.
  आजकाल फॊर्वड करून लोकांपेक्षा वेगळ पाठवायची स्पर्धा सुरु आहे त्या मुळे ही अडचण झाली आहे. जर लोकांनी शेअर करण्याचे अनेक पर्याय [सोशल गॅजेट्स किंवा सब्स्क्राइब बाय इमेल असे ]उपलब्ध करुन दिले तर आवडलेला लेख मित्रांना योग्य पद्धतीने पाठवता येतील ..
  सबस्क्राइब बाय इमेल हा पर्याय ज्याना इमेल उपलब्ध आहे पण ब्लॉग्गर नाही त्याना ही उपयोगी आहे.

  ReplyDelete
 7. मलाही सर्वप्रथम तुमचा लेख कोणीतरी फॉर्वड केल होता, कदाचीत पार्ल्या च्या कुठल्या तरी मासिकातला होता, पण मागाहून जे लेख आले, त्यात तुमची ब्लॉग ची लिंक होती...हा ही लेख सुंदर होता,धन्यवाद्....

  ReplyDelete
 8. ATAPRYANCHE SARVALEKH VACHLE.SUNDARCH AHET.
  SANJAY JOSHI PUNE

  ReplyDelete
 9. Mi Tumcha blog regular follow karato... arathat ek fwd mail alyavarch.. tumche vichar share karavese watun koni tari mail fwd kela asel.. Iccha asatana dekhil..tumache naav mahit tyavar takata yenar nahi.. tumhi navch lihit nahi..

  ReplyDelete
 10. khup chan lekh.... i agree with u....

  ReplyDelete
 11. Apan prasar na karta.. Aplya lekhancha aplya lekhacha vachakankadun prachar hoto.. Yatunach kalate ki apli lekhanachi pratibha apratim aahe.. Pharach sunder astat tumche lekh.. Keep it up.. :)

  ReplyDelete
 12. Hi Navin,
  Another masterpiece.... but sad to know that next thursday....I will be missing ur lekh.It became obsessive for me to visit ur blog every thursday.....anyways best luck for ur newwww project.
  Goddess Saraswati Bless you.

  Amit

  ReplyDelete
 13. Really good thoughts. It gives and shows meaning of each life and work/duty we are performorming. It gives immense pleasure if we see from the angle that whatever the work small or big it is contributing for the wellness of this universe. The same you linked here. Keep on coming such articles which help in creating positive and selfless energy in this universe.

  ReplyDelete
 14. खूप छान लिहीलय! अगदी मनाला भिडणारं!

  ReplyDelete
 15. शतशः पटले! अशा परिस्थितीत मनामध्ये होणारे द्वंद्व अतिशय समर्पक रीतीने वर्णन केले आहे.

  हे trusteeship चे अंतिम सत्य फक्त शब्दांपुरते मर्यादित नाहीये, अगदी स्वतःच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा लागू होतात!

  असो,मला पण तुमचे लेख आधी forward मेल मधूनच यायचे. नुकतेच मी आता सबस्क्राइब केले आहे.

  ReplyDelete
 16. लेख आवडलाच. त्यानिमित्ताने एक मजेशीर अनुभव इथे देतोयः

  मी दरवर्षी ३१ डिसेंबर च्या आसपास पुढील वर्षासाठी शुभेच्छांसाठी एक कविता इंग्लिश मध्ये करून माझ्या खास परिचयातल्या अशा ४०-५० व्यवसायातील जगभरातील मित्रांना, तसंच ४०-५० नातेवाईकांना पाठवतो. हा उपक्रम २००० सालापासून चालू आहे.

  २००९ साली जानेवारीमध्ये माझ्या मुंबईतील एका मित्राला (ज्याला मी माझ्या कविता दरवर्षी पाठवतो) त्याच्या सर्वसाधारण परिचयातील पण मला माहित नसलेल्या एका व्यक्तीकडून माझी २००६ सालची कविता शुभेच्छा म्हणून मिळाली, त्यावर माझं नाव काढून त्या जर्मन मित्राने स्वतःचं नाव टाकलं होतं.

  माझ्या मित्राने त्याला खालील उत्तर पाठवून मला 'कॉपी' केलं होतं:

  "डिअर पीटर,
  कवितेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. तू पाठवलेली कविता २००६ साली माझ्या दुसर्‍या एका मित्राने पाठवली होती. ती त्याची रचना तुला चोराविशी वाटली आणि स्वरचित म्हणून पुढे पाठवाविशी वाटली यात त्या शब्दांचं यश आहे. हे त्या मूळ कवीला जाणवावं म्हणून मी त्या मित्राला इथे कॉपी करतो आहे. आणि इथून पुढे दरवर्षी त्याने तुलाही अशा शुभेच्छा पाठवाव्यात, अशी त्याला विनंती करतो."

  ReplyDelete
 17. Dear Sir,
  I want to talk you or write to you.
  Can i get your email - id please.
  It's a request
  Regards,
  shrikantrathi2004@yahoo.co.in

  ReplyDelete
 18. तुम्ही खूपच छान लिहिता.....जे मनाला पटतं, ह्दयाला भिडतं...तुमच्या लेखनाचं वेगळेपण हे तुमचं खास वैशिष्ट्य आहे...

  स्नेहा

  ReplyDelete
 19. khup chaan lihita tumhi.... asech lihit raha... khand padu n deta.... Please...

  ReplyDelete
 20. naveen aahech, paN phaar chhaan, samarpak aaNee khara suddhaa aahe.........

  asech aprateem lihit rahaa, aamhaalaa shrimanta aaNee shahaaNe karat rahaa...... !!!

  ReplyDelete
 21. Eeshwar , jo koni aahe to, tumhala aase lekh lihat rahanyachi kshmata devo heech icchha!!all the best!!

  ReplyDelete
 22. Agadi khare vichar mandalet... like Shakespeare, "naavat kaay aahe" :)
  mast vaatala vachun... all the best!!!

  Ani ya lekhatun ramdas swaminchya Vivek ani Vairagya chi athavan jhaali...
  I use to listen those on Star Maza...

  ReplyDelete
 23. bhaktacheni sabhimane | krupa keli dasharathine | Samarth Krupechi hi vachane | to ha dasbodh

  Sakal karne jagdishache | ani kavitwachi kay manavache | Aaishya apraman bolnyache kay ghvyave|

  ReplyDelete
 24. Aajch me blog account create kele.... Ani kay open karave tech suchena? Tevha sahajch kahitari navin type kele ani tumcha blog pahila. Atishay sundar Ahe!!! khup chan vatle.

  ReplyDelete
 25. Khare aahe.... mala hi aasach mail "Tumcha" aala pan tyavaar naav navhte....

  Vachun aanand jhala.... chaan aahe.... mhanun mi pan majhya mitranna pathavla.... pan tyasaathi tumhi keleli mehnat aamhala lakshat nahi aali hoti... pan aata lakshaat rahnaar.... next time tumchya nava sobat mail forward karnaaar....

  Best of luck for ur future...

  ReplyDelete
 26. तुमचा हा आणि इतर मराठी बॉग्स लोकप्रिय करण्यासाठी काय करावे लागे याची सविस्तरपणे मुद्देसूद मांडणी करावी.
  सुरेश साळी - sumegh2000@gmail.com

  ReplyDelete